१९ जानेवारी २०२५ नागपूर : जवाहर नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याद्वारा नागपूरमध्ये जेएनवी एलुमनी स्पोर्ट्स मिटचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात विविध खेळांमध्ये माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, चेस, १०० मीटर धावणे, रिले अशा खेळांनी दिवस रंगला.
या स्पोर्ट्स मिटमध्ये नवोदयचे अनेक एलुमनी सहभागी झाले होते. वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, हरियाणा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती यांसह ऑल इंडिया एलुमनींनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला. हा अनुभव सर्वांसाठी आनंददायी ठरला. जेएनवी नवेगाव बांध, गोंदिया एलुमनींनी नागपुरातील एलुमनींना आवाहन केले आहे की अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन जुन्या मित्रांसोबत वेळ घालवा आणि आठवणींचा आनंद लुटा.
जेएनवी एलुमनी स्पोर्ट्स मिट ही फक्त स्पर्धा नसून, ती जुन्या आठवणींना उजाळा देण्याची आणि मित्रमैत्रिणींशी पुन्हा एकदा जोडले जाण्याची पर्वणी ठरली.
Popular 6 min read