नवेगावबांध, २६ जानेवारी २०२५ : स्मृतिगंध बॉटनिकल गार्डन ही संकल्पना एक साधा वृक्षारोपण उपक्रम म्हणून सुरू झाली. मात्र, काळाच्या ओघात या उपक्रमाने बॉटनिकल गार्डनचे रूप धारण केले, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणे, शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना प्रोत्साहित करणे आणि त्याचबरोबर आपल्यातून निघून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचे (स्मृतींचे) स्मारक जतन करणे हा आहे
रहें ना रहें हम महका करेंगे, बन के कली बन के सबा बाग़े वफ़ा में... रहें ना रहें हम…प्राचार्य श्री. मुकुंद बलवीर सर, उपप्राचार्य श्री. मिश्रा सर, गुणवंत केदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व अलुमनी, शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने हा स्वप्नवत उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला आहे. स्मृतिगंध बॉटनिकल गार्डन म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि जेएनव्हीच्या सर्व परिवाराला एकत्र जोडणारा एक जिवंत दुवा आहे.
या उपक्रमाचे उदघाटन प्राचार्य श्री मुकुंद बलवीर सर यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२५ रोजी झाले. आपल्या नवोदय च्या खालील माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचे (स्मृतींचे) स्मारक जतन
1987 राजु लोनारे, 1987 मनीषा भोवते, 1987 धनंजय राऊत, 1987 किसन देशकर, 1988 आशिष कांबळे, 1988 विवेक निमजे, 1989 निशांत बेले, 1989 नरेंद्र इरपाते, 1989 सुनील वरठे, 1989 धनवंता नागपुरे, 1990 जयप्रकाश शेंडे, 1990 संजय निंबार्ते, 1990 दीपक बहेकार, 1992 जगदीश टेंभूर्णे, 1992 नंदू उईके, 1993 भीमराव ठवरे, 1993 रोहित राठी, 1995 राहुल दहेकर, 1999 चंदा दीपटे, 2000 राहुल कोचे,
Popular 6 min read