गोरेगाव, 10 जानेवारी 2025: गोरेगाव तालुक्यातील घूमर्रा येथील सरस्वती महिला विद्यालयातील गणित शिक्षक श्री वाय. सी. रहांगडाले यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च माध्यमिक शिक्षक गटातून प्रथम क्रमांक पटकावून गौरव प्राप्त केला आहे.
गोंदिया येथील सरस्वती महिला विद्यालयात 9 आणि 10 जानेवारी 2025 रोजी आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री योगेश रहांगडाले यांनी "अध्यापक निर्मित वैज्ञानिक वस्तू" या विषयावर आधारित मॉडेल तयार केले आणि उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाची प्रशंसा करत त्यांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल त्यांचा डायटचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्री रंगडाले आता राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
श्री योगेश रहांगडाले यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील वाटचालीसाठी नवोदय विद्यालय गोंदिया चे माजी विद्यार्थी श्री योगेश रहांगडाले यांना नवोदय परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा
Popular 6 min read