स्मृतिगंधाच्या सुगंधी फुलांचा सुगंध आमच्या हृदयात दरवळत राहतो.आमच्या स्मृतिगंधातील एक पूष्प, “धनवंता नागपुरे,” आमची वर्गमैत्रीण, जी एका दुर्धर आजारामुळे आम्हाला सोडून गेली, तिच्या आठवणींनी आज हृदय व्यथित झाले आहे. आयुष्य खूप क्षणभंगुर असते, हे मान्य आहे, पण काही प्रसंग मनाला चटका लावून जातात.
“जन पल भर म्हणतील हाय हायधनवंतानेही आयुष्यात अनेक स्वप्ने पाहिली असतील, काही कामे करण्याची तिची इच्छा असेल, पण नियतीने वेळ दिला नाही. तिच्या स्मृतींना आम्ही आमच्या आठवणींच्या स्वरूपात जिवंत ठेवू. या जाणीवेनेच आम्ही सर्व अलूम्नी एकत्र येऊन, अशा सर्व हरवलेल्या सर्व स्मृतींपुष्पांना उजाळा देण्याचे कार्य पुढे नेऊ.
धनवंता आणि अशा सर्व अलूम्नी मित्रमैत्रिणींना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या स्मृतींना हृदयाशी जपून ठेवत, त्यांची प्रेरणा आमच्या पुढील वाटचालीत आधार देत राहील.
- JAAN आणि स्मृतिगंध-१९८९ बॅच
धनवंता चुन्नीलाल नागपुरे
1989 Batch
(28-06-1978 to 23-01-2025)